‘त्यांना’ परत आमच्याकडे ‘नो एंन्ट्री’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  आपल्या मंडळातील पदाधिकारी असो किंवा नातेवाईक कार्यकर्ता असो. ज्यांना वाड्यावर जायचे असेल त्यांनी खुशाल जा. मात्र, त्यांना परत आमच्याकडे प्रवेश दिला जाणार नाही. वेळ आली तर मी आणि कर्डिले कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवाजी कर्डिले हे हिरो ठरले आहेत. लोकसभेत वेगळा आणि विधानसभेत वेगळा निकाल लागला गेल्याने कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होणे, ही वस्तुस्थिती आहे. असे मत खासदार डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केले. राहुरी येथे कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हा बँकेचे नूतन संचालक शिवाजी कर्डिले यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार सुजय विखे बोलत होते.

अध्यक्षस्थानी रावसाहेब तनपुरे होते. माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले, नगर जिल्ह्यात सर्व नातेवाईक कार्यकर्त्यांना आता तुम्ही समजून सांगण्याची खरी गरज आहे. विधानभवनात आपण मागच्या दाराने प्रवेश करणार नाही, तर राहुरी विधानसभा मतदार संघात पुन्हा निवडणूक लढवणार आहे.

माझ्याशी कोणाचे पटत नसल्यास याचा अर्थ याचा अर्थ विरोधात जाणे हा होत नाही. बंद पडलेला कारखाना सुरळीत करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून नेहमीच मदत केली. यापुढेही सहकार्य राहील, असेही ते म्हणाले. खासदार डॉ.विखे यांनी यावेळी उर्जामंत्री तनपुरे यांच्यावर चौफेर टीका केली.

ते म्हणले की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांबरोबर अन्यायाचे धोरण घेतले आहे. ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्यातच शेतकऱ्यांच्या विजेच्या बाबतीत गंभीर तक्रार आहेत. खुर्चीला चिटकून बसण्यापेक्षा राजीनामा द्यावा. आम्ही मंत्री असतो तर शेतकऱ्यासाठी राजीनामा दिला असता.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24