ताज्या बातम्या

Maharashtra : “मग शरद पवारांच्या पण कपाळावर गद्दर लिहिलय का?

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra : शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये सध्या जोरदार टीकास्त्र सुरु आहे. खासदार संजय राऊत हे जेलमधून बाहेर आल्यापासून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधत आहेत. मात्र शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

नरेश म्हस्के म्हणाले, संजय राऊत यांची अवस्था सध्या पिंजरे में पोपट बोले.. या हिंदी गाण्यासारखी झाली आहे. 40 आमदारांच्या नावाने खडे फोडतात. कुडमुड्या ज्योतिष्यासमोर कार्ड ठेवलेले असतात.

त्यापैकी एक कार्ड उचलतो आणि तो बोलतो. संजय राऊतही रोज सकाळी उठतात. 40 कार्डपैकी काही कार्ड उचलतात आणि बोलायला सुरुवात करतात, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.

तसेच अनेक नेत्यांनी पक्ष बदलले तसेच बंद केले याचेही दाखले नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. ते म्हणाले, मुळात गद्दार कोणाला म्हणतात काँग्रेसमधून शरद पवार साहेब बाजूला झाले..

ते काँग्रेसचे खासदार होते… काही लोक काही लोक घेऊन बाजूला झाले. मग शरद पवार साहेबांच्या पण कपाळावर गद्दर लिहिलय का? असा प्रश्न देखील त्यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय.. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांच्याही कपाळावर गद्दार लिहिलेला आहे, तुम्हाला दिसला असेल ते त्यांच्या बाजूला मग कसे बसतात? असेही नरेश म्हस्के म्हणाले आहेत.

Ahmednagarlive24 Office