…तर कोरोनाचे जंतू फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, इतका तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झाला आहे.

म्हणून राजकारण न करता राज्याला मदत केली पाहिजे. आधी महाराष्ट्र जगला पाहिजे, नंतर राजकारण आहे. माणसंच मेली तर कोण मतदान करणार आहे तुम्हाला, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

आमदार गायकवाड म्हणाले, भाजपच्या १०५ आमदारांनाही महाराष्ट्रातील जनतेने मतदान केले आहे हे भाजपाने विसरू नये. त्यांचे २० खासदारही महाराष्ट्राने निवडून दिले आहेत. अशावेळी केंद्रांकडून राज्यातील लसनिर्मिती कंपन्याना सांगितलं

जातं की तुम्ही महाराष्ट्राला लस, तसेच रेमडेसिविर देऊ नका. केंद्राकडे ऑक्सिजनची देखील मागणी केली तरी केंद्र सरकार देत नाही, अशी टीका त्यांनी केली. भाजपाच्या लोकांचं नीच राजकारण सर्व महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चंपा नावाचे ते चंद्रकांत पाटील…आज हा कोरोना कोणा पक्षाचा कार्यकर्ता पाहून येत नाही. कोरोना फक्त काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला होत नाही.

तर हा कोरोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला विळखा घालत आहे. आज बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला देण्यासाठी लसी आहेत, पण महाराष्ट्राला नाही. बांगलादेश, पाकिस्तान महाराष्ट्रपेक्षा जास्त महत्वाचे आहेत का? ही राजकारण करण्याची वेळ आहे,

” असेही गायकवाड म्हणाले. मोदी सरकार, फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. फडणवीस मुख्यमंत्री असते तर नरेंद्र मोदींनी काय केलं असतं? चंद्रकांत पाटील मंत्री असते तर काय केलं असतं?

राज्यातील मंत्री जीव तोडून नियोजन करत असताना मदत करायची सोडून राजकारण करत आहेत, खिल्ली उडवतात. हे सरकार अपयशी होईल हे पाहतात. पण यामध्ये लाखो लोक मरतील त्याचं काय?,” असा सवालही गायकवाड यांनी केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24