Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील पळशी येथील नागापूरवाडी येथे एका विहिरीमध्ये आईसह दोन चिमुरडयांचे मृतदेह आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची खबर लालू कोळेकर यांनी टाकळी डोकेश्वर पोलीस स्टेशनला दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, दि.५ रोजी दुपारी २:४५ च्या दरम्यान माका नामदेव बिचकुले या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये लहान मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना असल्याचे पळशी येथील लालू कोळेकर व गावकऱ्यांनी पाहिले.
घटना समजताच पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक सेंट वन्दे पोहेकॉ पितम मोदवे पोकॉ. रविंद्र साठे, पोकों, विवेक दळवी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
याप्रसंगी पळशीचे सरपंच प्रकाश राठोड यांनी ग्रामस्थांच्या मदतीने लहान मुलगी कांचन सोमा बिचकुले (वय ५), हिचा मृतदेह बाहेर काढत असताना, तिची आई बावडाबाई सोमा बिचकले (वय २६), हिचाही मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.
मात्र, मुलगा समाधान सोमा विचकुले (वय २), याचा मृतदेह यावेळी मिळून आला नाही. ग्रामस्थ व पोलिसांनी अथक परिश्रम घेत आई बागडाबाई व मुलगी कांचन विचकुले यांचे मतदेह बाजेला बांधन दोरांच्या सहाय्याने विहिरीच्या पाण्याबाहेर काढले. मात्र, लहान मुलगा समाधान याचा मृतदेह शनिवारी संध्याकाळपर्यंत सापडला नव्हता.
तो रविवार, दि.६ रोजी सकाळी ७ वा. विहिरीत सापडला. हा प्रकार आत्महत्या की, घातपात, याबाबत नागरिकांमधून संशय व्यक्त केला जात आहे. टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.