‘या’ ठिकाणचे व्हेंटिलेटर असून अडचण अन नसून खोळंबा!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-आज देशात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या दरम्यान एकीकडे अनेक ठिकाणी वैद्यकीय साहित्य कमी पडत आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय साहित्य धूळ खात पडल्याचे विदारक चित्र आहे.

श्रीगोंदा तालुक्यात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे उपकरणे उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

गेल्या दोन दिवसांत व्हेंटिलेटर अभावी दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात माजी मंत्री आ. पाचपुते यांच्या निधीतून आलेले दोन व्हेंटिलेटर काही महिने झाले तरीही धूळ खात पडले असून, याबाबत प्रशासन अजूनही उदासीनच दिसत आहे.

व्हेंटिलेटर सुविधा चालू केली तर गंभीर परिस्थिती असणाऱ्या रुग्णांना तात्काळ उपचार चालू होऊन प्राण वाचण्यास मदत होईल.

तसेच HRCT स्कॅन सुविधाही श्रीगोंद्यात उपलब्ध नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दौंड किंवा नगरला जाऊन स्कॅन करावे लागत आहे.

या सर्व प्रक्रियेला विलंब होत असल्याने रुग्णांवर उपचार होण्यास काही प्रमाणात उशीर होत असल्याने काही रुग्ण गंभीर स्थितीत जात आहेत.

या सर्व गोष्टी अक्षय अनभुले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच अहमदनगर सिव्हिल सर्जन यांना निवेदनाद्वारे आणि दूरध्वनीद्वारे लक्षात आणून दिलेल्या आहेत.

लवकरात लवकर लक्ष घालून या सुविधा चालू करण्यात येतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24