Sanjay Raut : फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो; शिंदे गटात फुटीची तयारी सुरु

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काही महिन्यांपूर्वी ईडीने अटक केली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊत आता बाहेर आले आहेत. संजय राऊत यांनी आता पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपवर निशाणे साधायला सुरुवात केली आहे.

संजय राऊत यांनी शिंदे गटाबाबत एक मोठं आणि खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. शिंदे गटात फूट पडण्याची तयारी सुरु झाल्याचे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कोणता गट काय मतं व्यक्त करतो त्यात मला पडायचे नाही. पण महाराष्ट्रात मध्यावधीची तयारी सुरू झाली आहे.

जे म्हणतात हा आमच्याबरोबर आहे, तो आमच्याबरोबर आहे, त्यांच्या गटातच मोठी फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो हे लक्षात घ्या असे संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेनेचे कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असणारे गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. तसेच अमोल कीर्तिकर यांनी ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांनी गजानन कीर्तिकर यांच्याबद्दलही भाष्य केले आहे. ते म्हणाले, अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात राहिलेले कडवट शिवसैनिक आहेत.

ते शिवसेनेसोबत आहे. ठिक आहे, गजाभाऊंनी एक निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयासोबत अमोल नाहीत. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. याचा आम्हाला आनंद आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.

अमोल कीर्तिकर आमच्यासोबत आहेत, याचा निर्णय मोठा आहे. माझ्या शब्दात सांगायचे म्हणजे 100 दिवसानंतर तुरुंगातून सुटल्यावर मला जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षा अधिक मला अमोल भेटायला आला, तो पक्षासोबत आहे. त्याने वडिलांना समजावण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्याचा आनंद आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी अमोल कीर्तिकर यांचे कौतुक केले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, अमोल सारख्या कडवट लोकांमुळेच शिवसेनेचा पुढचा प्रवाह जाणार आहे. असे असंख्य अमोल कीर्तिकर आहेत. सूरज चव्हाण आहेत, आम्ही आहोत, तरुण मुले आहेत.

महाराष्ट्रात सर्वत्र काम सुरू आहे. आदित्य ठाकरे फिरत आहेत. उद्धव ठाकरे फिरणार आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना वाढणार आहे.