‘एमपीएससीच्या परीक्षेत बदल नाही, खबरदारी घेऊन रविवारची परीक्षा पार पाडू’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा वेळापत्रकानुसार होणार पार पडणार आहे.

परीक्षेच्या तारखेत बदल नाही. योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन होऊन परीक्षा पार पाडली जाणार, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरही झाला. गेल्या महिन्यात २१ मार्चला पार पडलेली एमपीएससीची पूर्वपरीक्षा विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच पार पडली असे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

दरम्यान, राज्यात शनिवार-रविवार लॉकडाऊन असल्याने परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या परीक्षेदरम्यान वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी, असं आवाहन सरकारला केलं होतं.

लॉकडाऊन असताना रविवारी होणाऱ्या MPSC परीक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत.

तसेच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24