अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- ओझर खुर्द ग्रामस्थांच्या मागणीवरुन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री जलजीवन योजनेतंर्गत ६८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला.
यामुळे ही ऐतिहासिक योजना मार्गी लावली. घरोघरी नळाद्वारे स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे. स्मशानभूमीचे काम देखील मार्गी लागणार आहे. तालुक्यात विकास कामांचा वेग कायम अाहे.
मंत्री थोरात यांनी विकास कामात भेदभाव केला नाही, असे प्रतिपादन थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केले. ओझर खुर्द येथे पाणीपुरवठा योजना भूमिपूजन, नेमबाई माळ रस्ता व शाळेची संरक्षक भिंत कामाचा शुभारंभ समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हस्ते झाला.
या प्रसंगी थोरात बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य शांताबाई खैरे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, गिताराम शिंदे, अण्णासाहेब थोरात, भाऊसाहेब साबळे, सुरेश थोरात, सरपंच पुंजाहरी शिंदे, बाजीराव शिंदे, दीपाली वर्पे, बकुनाथ साबळे,
बाबासाहेब बनवाले, शांताराम कदम, पाराबाई शेपाळ यावेळी उपस्थित होते. इंदुरीकर म्हणाले, संगमनेर तालुक्याला सुसंस्कृत समृद्ध नेतृत्व लाभले असून तालुका विकासातून अग्रेसर ठरला आहे. वर्पे म्हणाल्या, ही योजना मंत्री थोरात यांनी मार्गी लावली. इंग्रजीत थोरात यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला.