अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- सध्या नेवासा तालुक्यात करोना संसर्ग वाढत असून सोनई व घोडेगाव येथे परवा 7 व 5 असे संक्रमित आढळले दररोज सोनई घोडेगावात करोना रुग्ण आढळत आहेत
मात्र जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व प्रशासनाकडून कडक आदेश असतानाही केवळ स्थानिक वाहतूक पोलीस मात्र बेकायदा प्रवाशी वाहतूक वाहनांमधील विना मास्क प्रवाशांवर कारवाई करीत नसल्याने स्थानिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बेकायदा प्रवाशी वाहनांमधून प्रवास करणारे कुठलेही सोशल अंतर न पाळता दाटीवाटीने मास्क न लावता प्रवास करत असल्याचे चित्र नेवासा तालुक्यात दिसत असून वाहतूक पोलीस वाहनधारकावर कुठलीही कारवाई करीत नसल्याचे भयानक वास्तव आता पुढे येऊ लागलेले आहे.
मात्र रस्त्यावर प्रवास करणार्या खासगी वाहन धारकांना मास्क बाबतचे दंड व कारवाया केल्या जात आहे. सोनई पोलीस ठाण्याचे अखत्यारीत घोडेगाव येथे बीट हवालदार, पोलूस कर्मचारी व वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आलेली आहे वाहतूक सुरळीत करण्याचे काम करण्याऐवजी वाहतूक पोलीस वेगळ्याच कामात गर्क असल्याचे सांगण्यात येते.
मात्र स्वतःचे खाजगी वाहनाने प्रवास करणार्या बाहेरगावाहून आलेल्या वाहनांना त्रास देऊन कधी पावती फाडणे तर कधी विना पावती दंड केला जात असल्याची माहिती असून वरिष्ठांनी याकडे लक्ष घालून घोडेगाव चौफुला येथे कार्यक्षम पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे.