अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात चोरीच्या रेकॉर्डब्रेक घटना घडत आहे. चोरीच्या घटना घडतात त्यांची नोंद पोलीस ठाण्यात होते व हे प्रकरण इथेच संपते. गुन्ह्याच्या तुलनेत शोध व चोरट्याने पकडण्याचा आलेख पाहता यामध्ये पोलिसांची कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे पाहायला मिळते आहे.
नुकतेच श्रीरामपूर शहरातील एका महिलेच्या घराच्या पाठिमागील दरवाजा उचकटवून घरात प्रवेश करुन घरातील कानातील सोने व ऐवजाची चोरी केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील पूर्णवादनगर, इंद्रप्रस्थ कॉलनी या ठिकाणी राहणार्या महिला तृप्ती मच्छिंद्र आहेर यांच्या राहत्या घराच्या पाठी मागील दरवाजास हत्याराने उचकटवून दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला.
त्यानंतर या दोन चोरट्यांनी आहेर यांच्या घरातील सोनायचा ऐवज एक्टिवा गाडीची चावी तसेच घराच्या कुलपाची चावी अशा मालमत्तेची चोरी केली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तृप्ती आहेर यानी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.