…म्हणून कोरेगावचे ग्रामदैवत कोरेश्वर महाराज यांची रथयात्रोत्सव यंदाही रद्दच

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कर्जत तालुक्यातील कोरेगावचे ग्रामदैवत कोरेश्वर महाराज यांची रथयात्रा रद्द करण्यात आली आहे. यंदा सलग दुसऱ्यांदा ही यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान सालाबादप्रमाणे दरवर्षी नारळी पौर्णिमेला या यात्रेचे आयोजन करण्यात येत असते. जिल्ह्यात कोरोनाचा कहर अद्यापही कायम आहे. यामुळे अनेक सणउत्सव यांना मर्यादा आलेली आहे.

यातच ग्रामस्थांना यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने शासनाकडून सर्व मंदिरे बंद ठेवण्याबाबत व कोणताही धार्मिक कार्यक्रम करण्यास मनाई केली असल्याने

आपल्याला यावर्षी देखील कोरेश्वर महाराजांची रथयात्रा उत्सव रद्द करून आपल्या घरातच पूजा-अर्चा करून रथोत्सव साजरा करावा लागणार असल्याचे सांगितले.

भाविकांसाठी महत्वपूर्ण सूचना

मंदिर परिसरात कोणीही गर्दी करू नये.

सर्व पूजा अर्चा घरातूनच करावी.

२१ ते २३ ऑगस्ट या कालावधीत कडक जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.

कोणीही मंदिर परिसरात फिरकू नये.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24