Android users beware: अँड्रॉइड वापरकर्त्यांनी सावधगिरी (Android users beware) बाळगणे आवश्यक आहे. एका नवीन अहवालानुसार मालवेअर असलेल्या अनेक अॅप्सची माहिती समोर आली आहे. या अॅप्सचा उद्देश वापरकर्त्यांचा डेटा चोरणे हा आहे. याशिवाय त्यांना बँकिंग तपशील, पिन, पासवर्ड आणि वापरकर्त्यांची इतर माहिती देखील मिळते.
या अॅप्सबद्दल असे सांगण्यात आले आहे की, ते मोबाईल फोनचे टेक्स्ट मेसेज देखील वाचू शकतात. असे मालवेअर असलेले अॅप्स (Apps containing malware) गुगलच्या प्ले स्टोर (Google Play Store) सुरक्षेला बायपास करतात. त्यांना ड्रॉपर अॅप्स (dropper apps) देखील म्हणतात. सुरक्षा संशोधक ट्रेंड मायक्रोने (Security researcher Trend Micro) याबाबत माहिती दिली आहे.
17 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे –
ट्रेंड मायक्रोने अशा 17 अॅप्सची माहिती दिली होती जी तुमच्या फोनवर इन्स्टॉल होऊ शकतात. ते तुमचा मौल्यवान डेटा (valuable data) देखील चोरू शकतात. गेल्या वर्षी Trend Micro ने नवीन ड्रॉपर आवृत्ती DawDropper बद्दल सांगितले होते.
हे सर्व अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होते. त्यानंतर गुगलने हे अॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले. हे अॅप अजूनही तुमच्या मोबाइलवर असू शकते. येथे आपण या अॅप्सची संपूर्ण यादी जाणून घेणार आहोत. हे अॅप्स तुमच्या फोनमध्ये अजूनही असतील तर तुम्ही ते लगेच डिलीट करावेत.
अॅप्सची संपूर्ण यादी:-
क्लोन अॅप्सवर बंदी घातली जाईल –
गुगल सपोर्ट पेजनुसार, इतर अॅप्सचे क्लोन आयकॉन, लोगो, डिझाईन किंवा टायटल वापरणाऱ्या अॅप्सवर 31ऑगस्टपासून बंदी घातली जाईल.