ताज्या बातम्या

Diesel car under 8 Lakh : या 3 गाड्या तुम्हाला करतील पेट्रोल-सीएनजीपासून टेन्शन फ्री, किंमत 8 लाखांपेक्षाही कमी

Published by
Ahmednagarlive24 Office

Diesel car under 8 Lakh : देशात इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच आता सीएनजीच्या किमतीतही पेट्रोल डिझेलपाठीमागे वाढतच चालल्या आहेत. आता अनेकजण इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यावर भर देत आहेत.

महागड्या पेट्रोलचा त्रास टाळण्यासाठी लोक सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार खरेदी करतात. मात्र सीएनजी भरण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते, तर इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी अनेक तास लागतात. अशा परिस्थितीत ग्राहकांना डिझेल कारचा पर्याय उरला आहे.

Hyundai च्या मते, त्यांच्या डिझेल इंजिन कारच्या विक्रीत वाढ झाली आहे. डिझेल गाड्यांना सीएनजीसारख्या लांबच लांब रांगांचा त्रास होत नाही. तुमच्यासाठी सर्वात स्वस्त डिझेल कारची यादी घेऊन आलो आहोत.

1. Honda Amaze

Honda Amaze ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. त्याच्या डिझेल व्हेरिएंटची किंमत 9.02 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे, जे 100PS पॉवर आणि 200Nm पर्यंत टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिनसह, त्याचे मायलेज 24.7kmpl पर्यंत आहे.

2. Tata Altroz

त्याच्या डिझेल प्रकाराची सुरुवातीची किंमत 7.90 लाख रुपये आहे. Altroz ​​मध्ये पेट्रोल सोबत 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे. हे डिझेल इंजिन 90hp पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिनला फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय मिळतो. त्याचे मायलेज 25.11kpl पर्यंत आहे.

3. Hyundai i20

Hyundai i20 च्या डिझेल प्रकाराची सुरुवातीची किंमत 8.43 लाख रुपये आहे. याला 1.5-लिटर डिझेल इंजिन मिळते, जे 100PS ची पॉवर आणि 240Nm पर्यंत टॉर्क जनरेट करते. यात 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय आहे. कारचे मायलेज 25.0 kmpl पर्यंत आहे.

Ahmednagarlive24 Office