लंडन चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतही याला अपवाद नाही. कोरोनाच्या लक्षणांमध्ये दिवसागणिक बदल होत असल्याने शाश्त्रज्ञही अवाक झाले आहेत.
एखाद्यास आजाराची पार्श्वभूमी असल्यास त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. मधुमेह, श्वासोच्छवास आणि फुप्फुसांसंबंधित आजार आणि अन्य गंभीर आजार असल्यास मृत्यूची शक्यताही वाढते.
बीएमजेनुसार 50 वर्षापेक्षा जास्त पौढ, पुरुष, स्थुलत्व, ह्रदयरोग, फुप्फुस, मूत्रपिंड आदी संदर्भातील आजार असलेल्या कोरोना बाधितांना मृत्यूचा धोका असतो.
ब्रिटेनचे लिव्हरपूल विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांसह अन्य सर्वांनी इंग्लंडमधील रुग्णालयात भरती झालेले ४३ हजार हून जास्त रुग्णांचा अभ्यास करून दिलेल्या माहितीनुसार 6 फेब्रुवारी ते 19 एप्रिलदरम्यान इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडमधील 208 रुग्णालयात भरीत झालेल्या २० हजार 133 रुग्णांच्या आकड्यांचे विश्लेषण करण्यात आले.
अभ्यासानुसार रुग्णालयात भरती झालेल्यांचे वय सर्वसाधारण 73 होते आणि महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त होती. वयाबरोबरच ज्यांना ह्रदय, फुप्फुस, यकृत. मूत्रपिंज आदीबाबत आजार असलेल्यांना अधिक त्रासाचा सामना करावा लागत होता.
भारत कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्रालयानुसार सांगितले जात आहे की, मृत्यूच्या विश्लेषणानुसार कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांमध्ये 64 टक्के पुरुण आणि 36 टक्के महिला आहेत.