Alert : ‘या’ आजारांमुळे होते किडनीचे नुकसान; तुम्हालाही असतील आजार तर काळजी घ्या, नाहीतर..

Alert : अनेकांना किडनीशी संबंधित आजार असतात. त्याशिवाय अनेकांना असे काही आजार असतात त्यामुळे त्यांच्या किडनीवर गंभीर परिणाम होतो. हा आजार अगदी सामान्य असतो. 

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परिणामी त्यांची किडनीही निकामी होते. त्यामुळे जर तुम्हालाही असतील आजार तर काळजी घ्या नाहीतर तुमची किडनी निकामी होईल. किडनी निरोगी ठेवण्यासाठी काही आजार नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते.

त्याचबरोबर मधुमेह आणि रक्तदाबाची अनियंत्रित स्थितीमुळे किडनीला हानी पोहोचते. त्याचबरोबर तुम्हाला धुम्रपान किंवा लठ्ठपणा असेल तरीही तुमच्या किडनीला धोका निर्माण होतो.

Advertisement

मधुमेह

मधुमेहामुळे किडनी निकामी होण्याचा धोका जास्त असतो. टाइप-1 आणि टाईप-2 दोन्ही मधुमेहामुळे तुमच्या किडनीला नुकसान होते. जर रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत असेल तर किडनी निकामी होते.

Advertisement

रक्तदाब

रुग्णाचे रक्तदाब वाढले तरीही किडनी निकामी होण्याची शक्यता असते.उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या रक्तवाहिन्या खराब होऊ लागतात. असे झाल्यास शरीरातून कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकणे कठीण होते.

Advertisement

मूत्रमार्गाचा संसर्ग

जर तुम्हाला मूत्रमार्गात संक्रमण होत असेल तर ते मूत्रपिंडासाठी घातक ठरू शकते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये याचा जास्त धोका असतो. UTI विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय करून मूत्रपिंडाच्या आजारांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांना UTI संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

Advertisement

ही कारणेदेखील असू शकतात

इतर काही शारीरिक परिस्थिती किडनीच्या समस्या वाढवू शकतात असे आरोग्य तज्ञांना असे आढळून आले आहे.

Advertisement
  • पॉलीसिस्टिक किडनी डिसीज हा एक अनुवांशिक आजार असल्यामुळे मूत्रपिंडात अनेक सिस्ट विकसित होतात.
  • त्याशिवाय खूप वेदनाशामक औषधांमुळे किडनीचा त्रास होऊ शकतो.
  • मुलांमध्ये हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोमची स्थिती.
  • धातू विषबाधा किंवा शिसे विषबाधा.