ताज्या बातम्या

PM Kisan Yojana Alert : ‘या’ शेतकऱ्यांना राहावे लागणार 13 व्या हप्त्यापासून वंचित, यादीत तुमचा तर समावेश नाही ना?

Published by
Ahmednagarlive24 Office

PM Kisan Yojana Alert : सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या शेतकऱ्यांना आतपर्यंत 12 हप्ते मिळाले आहेत.

आता देशभरातील शेतकरी 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.अशातच शेतकऱ्यांना धक्का देणारी एक बातमी आहे. काही शेतकरी या 13 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.

या शेतकऱ्यांचा अडकेल हप्ता

या योजनेशी निगडित लाभार्थ्यांची पडताळणी सरकारकडून वेगाने सुरु आहे. जर तुम्ही अजूनही जमिनीची पडताळणी केली नसेल, तर ती लगेच करा. नाहीतर तुमचा13 वा हप्ता अडकू शकतो.

जमीन पडताळणीसाठी तुम्हाला जवळच्या कृषी कार्यालयाला भेट द्यावी लागणार आहे.

अशीही करता येईल पडताळणी

जर तुम्हाला जमीन पडताळणी किंवा इतर कोणत्याही प्रकारची मदत पाहिजे असेल तर तुम्ही पीएम किसान योजना हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 1800115526 वर कॉल करून मदत घेऊ शकता.

कधी येईल 13वा हप्ता

आत्तापर्यंत योजनेचे 12 हप्ते जाहीर झाले असून ते आता 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो हप्ता जानेवारी महिन्यात जमा होऊ शकतो.

Ahmednagarlive24 Office