ताज्या बातम्या

Toll Tax : देशातील ‘या’ लोकांना भरावा लागत नाही कर, पहा लिस्ट…

Published by
Ahmednagarlive24 Office

Toll Tax : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना अनेक टोल द्यावे लागतात. टोल नाक्यावर तुम्ही गाड्यांची लांबच लांब रांग पाहिलेलीच असणार. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थातच NHAI कडून हा टोल टॅक्स वसूल करण्यात येतो. तुम्हीही एखादी रोड ट्रिप करता तेव्हा तुम्हालाही हा टॅक्स भरावा लागतो.

हा टोल भरल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. हा एक प्रकारचा शुल्क असून जो कोणत्याही वाहन चालकाला इंटरस्टेट एक्सप्रेस वे, नॅशनल किंवा स्टेट हायवे पार करत असताना द्यावा लागतो. परंतु, भारतात असे काही लोक आहेत ज्यांना टोल भरावा लागत नाही.

भारत सरकारने याबाबत विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून यात कोणत्या लोकांना टोल टॅक्स भरावा लागत नाही, याची माहिती दिली आहे. पाहुयात संपूर्ण यादी.

या लोकांना टोल टॅक्स भरावा लागत नाही

  • भारताचे राष्ट्रपती
  • पंतप्रधान
  • मुख्य न्यायाधीश
  • उपाध्यक्ष
  • राज्याचे राज्यपाल
  • केंद्रीय कॅबिनेट मंत्री

  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
  • लोकसभेचे अध्यक्ष
  • केंद्रीय राज्यमंत्री
  • राज्याचे मुख्यमंत्री
  • केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर
  • राज्य विधानसभेचे अध्यक्ष
  • उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

  • राज्याच्या विधान परिषदेचे अध्यक्ष
  • भारत सरकारचे सचिव
  • संसद सदस्य
  • सैन्य कमांडर
  • लष्कराचे उपप्रमुख
  • संबंधित राज्यातील राज्य सरकारचे मुख्य सचिव
  • एखाद्या राज्याच्या विधानसभेचा सदस्य
  • राज्य दौऱ्यावर असलेले परदेशी मान्यवर
Ahmednagarlive24 Office