शहर व परिसरातील ही ठिकाणी बनतायत गुन्हेगारांचे अड्डे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात गुन्हेगारी वाढली असून, त्यामुळे शहरातील निर्जन स्थळ हे गुन्हेगारांचा अड्डा बनतोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे अशी भयंकर परिस्थिती असतानाही पोलिसांकडून मात्र संबंधित गुन्हेगारांवर खाकीचा वचक ठेवण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील सरोज टाकी परिसरातील मोकळे मैदान, बालिकाश्रम ते बोल्हेगाव रस्ता, तपोवन रोडवरील भिस्तबाग महाल परिसर, कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज, जुने आरटीओ कार्यालय परिसर, बालिकाश्रम रस्त्यावरील कृषी कार्यालय परिसर आदी ठिकाणी बसून गुन्हेगार दारू,

गांजा रिचवतात आणि रात्री चोऱ्या, घरफोड्या, रस्ता लूट करतात तसेच एकटी महिला दिसली की, छेडछाडीचेही प्रकार घडतात. अशा ठिकाणी पोलिसांनी रात्रीची पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

शहरातील ही परिसर ठरू शकतात धोकादायक….

शहराजवळील चांदबीबी महाल, मांजरसुंबा, गोरक्षनाथ गड, वांबोरी घाट, केकताई परिसर आदी ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने जातात.

सध्या पावसाळा असल्याने येथे फिरायला जाणाऱ्यांचीही मोठी संख्या आहे. चोरटे आणि रोडरोमिओ यांच संधीचा फायदा घेतात. डोंगरात अथवा घाट परिसरात लपून बसलेले चोरटे पर्यटकांना अडवून लूटमार करतात तसेच महिलांच्या छेडछाडीचेही अनेक प्रकार या परिसरात घडले आहेत.

दरम्यान एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांनी वेळीच अशा घटनांना आवर न घातल्यास पुढील काळात पोलिसांबरोबरच नागरिकांना देखील ही समस्या डोकेदुखी ठरू शकते.