याच लोकप्रतिनिधींनी तालुक्यात कोरोना वाढवला ..?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, तहसिलदार यांनी पाहणी करून तालुका दहा तारखेपर्यंत लोकांनी उत्स्फुतपणे बंद केल्याचे जाहिर करण्यात आले.

या कालावधीत मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधीसह त्यांच्या पक्षांचे कार्यक्रम पार पडत असून, याच लोकप्रतिनिधींनी तालुक्यात कोरोना वाढविल्याचा आरोप भाजपाचे पारनेर तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केला आहे . ते म्हणाले की, सत्ताधारी पुढाऱ्यांवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नसून तालुक्यातील जनता वाऱ्यावर सोडून देण्यात आली आहे.

तालुका प्रशासन व्यापाऱ्यांना उत्स्फुर्तपणे लॉकडाऊन पाळण्यास सांगत असताना दुसरीकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र मोकाट आहेत. त्यांच्या सार्वजनीक कार्यक्रमांवर कोणतेही बंधन नाही. शेकडो नागरीकांच्या उपस्थितीत जाहिर कार्यक्रम पार पडत असल्याची टीका चेडे यांनी केली आहे. तालुक्यात कोरोनाची स्थिती गंभीर नाही.

प्रशासन मात्र ती जाणीवपूर्वक गंभीर असल्याचे भासवित आहे. तालुक्यात दररोज चार हजार कोव्हिड टेस्ट केल्या जातात. जिल्हयात नगर शहरासह कोठेही इतक्या मोठया प्रमाणावर टेस्ट केल्या जात नाहीत. तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे प्रशासनावर कोणताही धाक राहिलेला नसून त्यांनी पोरखेळ मांडल्याची टीका चेडे यांनी केली आहे.

आज मुंबई, ठाणे सारख्या मोठया शहरांमध्ये रात्री १० वाजेपर्यंत दुकाणे, व्यवहार चालू ठेवण्याचे आदेश झालेले आहेत. तालुक्यात मात्र सक्तीने दुकाणे बंद ठेवण्यास भाग पाडले जात आहे. हे शासन दारूची दुकाणे सुरू ठेउन मंदीरे मात्र बंद ठेवण्यात आलेली आहेत.

खरेदी विक्री व्यवहार, इतर व्यवहार सुरळीत सुरू असताना कोरोना फक्त दुकानदारांच्याच मुळावर का ? शेजारी शिरूर, बेल्हे, आळेफाटा, नगरमध्ये सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. याची माहीती प्रशासनास असूनही तालुका प्रशासन दुकानदारांना चोर म्हणून वागणूक देत आहे.

मुळात तालुक्यात कोठेही मोठी बाजारपेठ नाही. आहेत त्या बाजारपेठा उदध्वस्त करण्याचे काम लोकप्रतिनिधी व प्रशासन करीत आहे. दुकाणे बंद असल्यामुळे दुकानात काम करणारे कामगार त्यांच्यावर अवलंबून असणारे इतर घटक, ग्राहक यांच्यावर प्रशासनाच्या आठमुठया धोरणामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24