अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही.
त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. यासाठी पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी आणि काळाच्या ओघात जास्त रिटर्न देणारी असावी. यासाठी शेअरमार्केट उपयुक्त ठरेल. ज्यांमध्ये रिस्क घेण्याची क्षमता आहे त्यांना नक्कीच यात गुंतवणूक करून पैसे कमवता येतील. कारण यामध्ये पैसे टक्केवारीने नाही तर पटीने वाढतात.
आज अशाच एका शेअरबद्दल माहिती पाहुयात कि जो गगडी तीन रुपयांत उपलब्ध होता. अर्धा कप चहाच्या किमतीत येत असणाऱ्या या शेअर्स ने आज लोकांना मालामाल केले आहे. तो शेअर म्हणजे ‘एशियन पेट्रोप्रॉडक्ट्स अॅंड एक्सपोर्ट्स’. या कंपनीच्या शेअरनेदेखील गुंतवणुकदारांना अल्पावधीतच जबरदस्त कमाई करून दिली आहे.
तीनच महिन्यात पैसे दहापट करणारा शेअर :- मागील फक्त ‘एशियन पेट्रोप्रॉडक्ट्स अॅंड एक्सपोर्ट्स’ या कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल १० पटींनी वाढली आहे. सध्या हा शेअर ३२.२० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर आहे. तर ३ महिन्यांपूर्वी म्हणजे १ जून २०११ ला ‘एशियन पेट्रोप्रॉडक्ट्स अॅंड एक्सपोर्ट्स’ च्या शेअरची किंमत फक्त ३.३३ रुपये प्रति शेअर इतकी होती.
या कालावधीत ‘एशियन पेट्रोप्रॉडक्ट्स अॅंड एक्सपोर्ट्स’च्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी जबरदस्त कमाई केली आहे. तीन महिन्यांच्या कालावधी या शेअरने जवळपास ८६६.९६ टक्के परतावा दिला आहे. म्हणजे तीन महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास ९.५ लाख रुपये झाले आहे.
या शेअरने गुंतवणुकदारांसाठी चांगलीच संपत्ती निर्माण केली आहे. १ ऑगस्ट २०२१ ला हा शेअर ८.७४ रुपयांच्या पातळीवर होता. म्हणजे फक्त महिनाभरात या शेअरमधील गुंतवणूक जवळपास चौपट झाली आहे.