Interest Rate : ‘या’ छोट्या बँका देत आहेत सर्वात जास्त व्याज, खाते उघडल्यास व्हाल श्रीमंत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Interest Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. त्यामुळे कर्जाच्या दरात वाढ झाली आहे, तर काही बँकांनी बचत खात्यांवरील व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे.

या एसबीआय, पीएनबी यांसारख्या मोठ्या बँका नसून छोट्या बँका देत आहेत. त्या खात्यांमध्ये जमा झालेल्या पैशावर सर्वात जास्त व्याज देत आहे. जर तुमचे या बँकेत खाते असेल तर तुम्ही खाते उघडल्यानंतर श्रीमंत व्हाल.

आरबीआयकडून बँकेच्या व्याजदरावर रेपो दरात सतत बदल होत असतो. त्याचा बँक खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरावर परिणाम होतो. त्यामुळे बँक व्याजदर कमी-वाढत राहते. या निर्णयानंतर छोट्या बँकांनी व्याजदरात कमालीची वाढ केली आहे. याचा परिणाम बँकेच्या बचत खात्यावर होताना दिसत आहे.

SBI बँक, PNB बँक सारख्या देशातील काही मोठ्या बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँका आणि नवीन खाजगी बँका बचत खात्यांवर सर्वाधिक व्याज देत असून बचत खात्यावर ग्राहकांना सर्वाधिक 7.5 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक –

जर तुमचे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेत खाते असेल तर बचत खात्यावर मिळणारा व्याजदर 7.5 टक्क्यांपर्यंत आहे.

एयू स्मॉल फायनान्स बँक –

सध्या ही बँक आपल्या ग्राहकांना आपल्या बचत खात्यावर 7% पर्यंत व्याज देत आहे. एयू स्मॉल फायनान्स बँकेत सरासरी मासिक शिल्लक 2,000 ते 5,000 रुपये किमान शिल्लक ठेवणे गरजेचे आहे.

DCB बँक –

ही बँक सध्या आपल्या ग्राहकांच्या बचत खात्यावर 7% पर्यंत व्याज देत असून या बँकेत 2,500 ते 5,000 रुपये किमान शिल्लक ठेवणे गरजेचे आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक –

ही बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर 7% पर्यंत व्याज देत असून 2,500 ते 10,000 रुपये किमान शिल्लक ठेवणे गरजेचे आहे.

South Indian Bank आणि इंडसइंड बँक –

या दोन्ही बँका त्यांच्या बचत खात्यावर कमाल 6% पर्यंत व्याज देत असून इंडसइंड बँकेत एका महिन्यात किमान 1500 ते 10,000 रुपये शिल्लक तर तर दक्षिण South Indian बँकेत 1,000 ते 2,500 रुपये शिल्लक ठेवणे गरजेचे आहे.

बंधन बँक, CSB आणि RBL बँक

या तिन्ही बँका आपल्या ग्राहकांच्या बचत खात्यावर 6.5 टक्के व्याज देत आहेत. यापैकी CSB बँक आणि RBL बँकेत सरासरी शिल्लक रु. 2,500 ते रु. 5,000 पर्यंत गरजेचे असते. तर, बंधन बँकेत सरासरी मासिक शिल्लक रु. 2,500 ते रु. 5,000 पर्यंत असते.