अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- देशात हवा आणि ध्वनी प्रदुषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे केंद्र सरकार लवकरच इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्री वाढीसाठी नवीन धोरण आखणार आहे.
केंद्रासमोर सध्या चार्जिंग पॉईंट उभारण्याचे मोठे आव्हान आहे. कारण सध्याच्या तंत्रज्ञानानुसार 120 किमी पर्यंतच धावू शकणाऱ्या कार भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळेच भारतात चार्जिंग स्टेशन तयार करुन कमाई करण्याची नवी संधी निर्माण झाली आहे. या उपक्रमांतर्गत प्रदूषण कमी होण्यासह देशातील युवकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
केंद्र सरकारने देशात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु करण्याती योजना आखली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय ही योजना पुढे नेण्यासाठी तरुणांना ट्रेनिंग देत आहे.
ट्रेनिंगदरम्यान चार्जिंग स्टेशनबाबत संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. त्यासोबतच काम करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाविषयीही शिकवण्यात येणार आहे. या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला या व्यवसायाबद्दलची सगळी माहिती मिळते. यानंतर तुम्ही चार्जिंग स्टेशन सुरु करुन कमाई करु शकता.
चार्जिंग स्टेशनबद्दलचे अनेक नियम :- निती आयोगाने राज्य सरकारांना इलेक्ट्रिक वाहनांबद्दलचे नियम जारी केले आहेत. यासाठी एक हँडबूक देण्यात आलं आहे.
चार्जिंग स्टेशन सुरु करण्याबाबत यात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ज्या निती आयोग, विद्युत मंत्रालय, विज्ञान मंत्रालयातून जारी करण्यात आल्या आहेत.
भारताचं लक्ष्य आहे की या दशकाच्या शेवटपर्यंत म्हणजेच 2030 च्या आधी भारतातील 70 टक्के व्यावसायिक गाड्या आणि 30 टक्के खासगी गाड्या इलेक्ट्रिक झाल्या पाहिजे. तर 40 टक्के बस आणि 80 टक्के टू व्हीलर थ्री व्हिलर इलेक्ट्रिक असावे
चार्जिंग स्टेशन कसं सुरु करायचं? :- चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी अनेक ईव्ही कंपन्या तुम्हाला फ्रेंचायजी देतील. तुम्ही या कंपन्यांकडून फ्रेंचायजी घेऊन चार्जिंग स्टेशन सुरु करु शकता. एका अंदाजानुसार, एक चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी 4 लाखांचा खर्च येऊ शकतो.