‘या’ दोन सरकारी बँकांनी FD वरील व्याजदर मध्ये केला बदल

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि यूको बँक यांनी एफडीचे व्याजदर बदलले आहेत. नवे दर 10 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. याआधीही अनेक बँकांनी एफडीचे दर बदलले आहेत.

दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच धोरणात्मक दर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात सुधारणा केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नवीन व्याजदर – 7-14 दिवसांसाठी व्याज दर 2.75 टक्के आहे. 15-30 दिवसांसाठी 2.90 टक्के व्याजदर 31-45 दिवसांसाठी 2.90 टक्के 46-90 दिवसांसाठी 3.25 टक्के 1-179 दिवसांसाठी 3.80 टक्के आहे

यूको बँक नवीन व्याजदर :- 7-29 दिवसांसाठी 2.80 टक्के व्याजदर 30-45 दिवसांसाठी 3.05 टक्के 46-90 दिवसांसाठी 3.80 टक्के 91-180 दिवसांसाठी 3.95 टक्के 181-364 दिवसांसाठी 4.65 टक्के आहे 1 वर्षासाठी 5.35 टक्के 1-2 वर्षांसाठी 5.60 टक्के 2-3 वर्षांसाठी 5.60 टक्के 3-5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.80 टक्के 5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी 5.60 टक्के आहे