Health Tips : चुकूनही ‘या’ भाज्या फ्रीजमध्ये ठेवू नका, चवीसोबतच आरोग्यही करू शकते खराब !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tips To Store Vegetables In Fridge : आजच्या काळात स्त्री आणि पुरुष दोघेही बहुतांशी नोकरी करत असतात, त्यामुळे लोकांना रोज बाजारातून ताजी भाजी आणायला वेळ मिळत नाही. अशा स्थितीत ते एका हप्त्याची भाजी फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवता, जर तुम्हीही असे करत असाल तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

फ्रिजमध्ये भाज्या ठेवण्याआधी जाणून घ्या की कोणत्या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नये. अशा अनेक भाज्या आहेत ज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्यांचे पोषण कमी होते आणि चवही खराब होते.

कोणत्या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत?

भोपळा

भोपळ्यामध्ये बीटा कॅरोटीन चांगल्या प्रमाणात असते, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. यासोबतच यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक भोपळ्यामध्ये आढळतात. संपूर्ण भोपळा कोरड्या, थंड जागी महिनोनमहिने साठवून ठेवता येतो, पण जर तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये भोपळा ठेवला तर त्याच्या चवीवर परिणाम तर होतोच पण तो लवकर खराब होतो.

दुधीभोपळा

भोपळ्याप्रमाणेच दुधी भोपळाही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये. तुम्ही भोपळा विकत घेताना एकाच वेळी तो शिजवून खाऊ शकाल असा घ्या, भोपळा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषक घटक कमी होतात आणि ते लवकर खराब होऊ लागतात.

काकडी

काकडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्याची चव खराब होते. फ्रीजमध्येकाकडी ठेवल्यास ती कोरडी होऊ लागते. तसेच काकडी कोरडी पडल्याने रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्यास त्यातील पोषकतत्त्वेही कमी होतात.

बटाटा

कच्चा बटाटा कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये, कच्चा बटाटा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने ते कुजतात. फ्रीजमध्ये ठेवल्यास ते लवकर खराब होतात, तुम्ही उकडलेले बटाटे फ्रीजमध्ये ठेवू शकता परंतु कच्चा बटाटा फ्रीजमध्ये ठेवू नका.

कांदा आणि लसूण

कांदे आणि लसूण रेफ्रिजरेटरमध्ये लवकर खराब होऊ शकतात, यासोबतच रेफ्रिजरेटरच्या थंडपणामुळे ते लवकर सडू लागतात. कांदा आणि लसूण फ्रीजमध्ये ठेवल्याने इतर पदार्थांनाही तसाच वास येऊ लागतो. आपण कांदा आणि लसूण थंड, स्वच्छ ठिकाणी उघड्यावर ठेवू शकता.