अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाचे संकट दाट होत चालले आहे. यातच मागणी व पुरवठ्यावरून राज्य सरकार व केंद्रामध्ये तुतू मेमे सुरूच आहे.
याच मुद्द्यावरून राज्यातील नेतेमंडळी सध्या सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच महाविकास आघाडी सरकार बरोबरच नगर जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता.
यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलतां थोरात म्हणाले कि, विरोधीपक्षाचे ज्येष्ठ आमदार असल्याने सध्या त्यांच्याकडे जी भूमिका आली ती पार पाडत आहेत.
त्यांच्या मनात खूप नैराश्याची भावना असून त्याला वाट मोकळी करून देत असावेत, अशा शब्दात थोरात यांनी विखेंचे नाव न घेता त्यांना शाब्दिक टोला लागवला.
दरम्यान करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री थोरात नगरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विखे यांनी केलेल्या टिप्पणीला आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.