मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) सरकार विरुद्ध भाजप (BJP) असे टोकाचे राजकारण सध्या सुरु आहे. एकेमकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच सामनातून (Samana) भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, श्री. देवेंद्र फडणवीस हे काल शिर्डीत साईचरणी गेले व म्हणाले, राजकारण गेले चुलीत, मात्र इथले गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे, पण त्याला बट्टा लागलाय.
ही अवस्था महाराष्ट्रात (Maharashtra) कधीही पाहिली नव्हती. राजकारण जाईल चुलीत, महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे असे शहाणपणाचे उद्गार फडणवीस यांनी साईचरणी काढले,
पण महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम ते स्वतःच करीत आहेत. अशी टीका फडणवीसांवर करण्यात आली आहे.
तसेच या अग्रलेखातून भाजपवर ही निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे देवाच्या चरणी जाऊन बोलता हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा काय?
देवाच्या चरणी तरी खरे बोला! मुळात देशातील भाजपशासित राज्यांत गुड गव्हर्नन्सचा जो खेळखंडोबा चालला आहे त्याकडे एकदा डोळे उघडून पहा, म्हणजे महाराष्ट्रातील स्थितीविषयी सत्य समजायला मदत होईल असेही अग्रलेखात लिहण्यात आले आहे.
भाजपचे युगपुरुष किरीट सोमय्या हे हाती कागदी हातोडा घेऊन भ्रष्टाचविरुद्ध लढायला निघाले तर त्यांच्यासोबत कोण? ‘ईडी’कडे ज्यांच्या \मनी लॉण्डरिंग’चे 100 बोगस कंपन्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे दिले व ज्यांना तुरुंगात टाका,
अशी मागणी केली त्याच नारायण राणे यांच्या मुलास बाजूला बसवून हे महाशय कोकणातील भ्रष्टाचार संपवायला निघाले. अग्रलेखातून नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.