अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होते त्या आंदोलनात एक कार घुसून काही निष्पाप शेतकऱ्यांचा जीव गेला.
ही घटना निश्चितच दुःखदायी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे परंतु त्या घटनेची तुलना थेट जालियनवाला बाग हत्याकांडाशी करणाऱ्यांना मावळ तालुक्यात आपल्याच पक्षाचे सरकार असताना थेट शेतकर्यावर गोळीबार करून अनेक निष्पाप शेतकऱ्यांचा जीव घेतल्याचा विसर पडलेला दिसतोय.
अशा शब्दात खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पुढे बोलताना खा.विखे म्हणाले की,खासदार विखे म्हणाले उत्तर प्रदेशात घडलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात कार घुसून झालेल्या अपघाताची जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना करणार्या शरद पवार यांचे नाव न घेता टीका करत मावळ येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराची आठवण करून दिली.
तसेच नगर येथे महामार्गाच्या उद्घाटनासाठी आलेले देशाचे मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने हजारो कोटी रुपयांचा निधी दिला तिथं श्रेय लाटण्यासाठी विरोधी पक्षाच्या लोकांनी व्यासपीठावरच खुर्च्यांची ओढतान केली. विकास निधी कोणाचा श्रेय घेण्यासाठी धडपडतोय कोण, आमच्या सरकारने दिलेल्या निधीच श्रेय आम्हाला घेऊ द्या.
अशा शब्दात खासदार विखे यांनी नगर येथील कार्यक्रमात खुर्च्या वरून झालेल्या वादाबद्दल महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीचा चांगलाच समाचार घेतला. अतिवृष्टीमुळे पाथर्डी शेवगाव नगरसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसानीचे पन्नास हजारापासून एक लाखापर्यंत तातडीची मदत द्या तिथं श्रेय घेण्याचा प्रयत्न करावा. असा टोला लगावला.