ताज्या बातम्या

“ते फक्त टाइमपास करू इच्छितात, संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे”

Published by
Ahmednagarlive24 Office

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. तसेच किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना आव्हान केल्याचे दिसत आहे.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांतप्रकरणी (INS Vikrant) निधी गोळा केला आणि तो निधी राजभवनापर्यंत पोहोचलाच नाही असा आरोप केला आहे. त्यांनतर सोमय्या यांनी लगेच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत काय आरोप केले?

आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी पैसे जमावले. कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसी दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. मात्र, हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत.

केंद्रीय तपास यंत्रणा पारदर्शक असतील, तर त्यांनी या घोटाळ्याची चौकशी करावी. विक्रांतसाठी जमा केलेली रक्कम कुठे गेली, याचा छडा लावावा, असे आव्हान त्यांनी दिले.

आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी विक्रांतवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील देणगी दिली आहे. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे.

किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

सोमय्या म्हणाले की, ईडीच्या (ED) कारवाईमुळे संजय राऊत गोंधळलेले आहेत. किरीट सोमय्याने काही केले असेल, तर त्याचे पुरावे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) द्यावे. त्यांनी अनेक आरोप केले.

मात्र, त्यांना पुरावे मिळालेच नाहीत. ते फक्त टाइमपास करू इच्छितात. संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या एका कंपनीविरोधात भारत सरकारने कालच मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केलाय.

ही कंपनी जानेवारी 2021 मध्ये बनवली. दोन महिन्यांत परवानगी मागितली, कोविड कामे मिळवली. संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देत अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली आहे.

Ahmednagarlive24 Office