अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना पारनेर तालुक्यातील पळशी येथील पुरातन असलेल्या विठ्ठल मंदिरास ‘क’ वर्ग दर्जा देऊन मोठा दिला आहे.
सुरेख कलाकृती असणारे पळशीचे श्री.विठ्ठलाचे मंदिर हे वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. परमेश्वर सेवेतून मला आत्मसमाधान मिळते त्यामुळे यापुढेही या मंदिराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. असे मत जि. पचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले.
गावात एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, प्रगत असलेल्या अभियांत्रिकी युगात देखील अशी कलाकृती कोणी साकारू शकत नाही राही, रुख्मिणी व श्री विठ्ठल मूर्ती या ठिकाणी आहेत.
विशेषतः श्री विठ्ठलाची संपूर्ण मूर्ती ही शालीग्राम या अदभुत पाषाणात तयार केलेली आहे. या मंदिरास जगाच्या समोर आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या पुढेही या मंदिराच्या सुशोभीकरण विकास कामात हातभार लावण्यात येईल.
यावेळी गावातून बैलगाडीवर मिरवणूक काढून सुजित झावरे पाटील व परिवाराच्या वतीने श्री.विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस चांदीची मूर्ती अर्पण करण्यात आले.