ठाणे : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर INS विक्रांत प्रकरणी घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता.
कोर्टाने किरीट सोमय्या यांना दिलासा दिल्यानांतर संजय राऊत यांनी भाजपवर अनेक आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे नक्की पाणी कुठे मूर्त आहे हे लोकांना समजत नसल्याचे सध्याचे राजकारण सुरु आहे.
संजय राऊत म्हणाले, गेल्या काही काळापासून भाजपच्या लोकांना दिलासा मिळत आहे. दिशा सालियन, मुंबई बॉम्ब प्रकरण ते विक्रांत घोटाळा (INS Vikrant) करणाऱ्या आरोपींपर्यंत एका रांगेत सर्वांना दिलासे कसे मिळतात?
न्यायव्यवस्थेवर (Justice system) कुणाचा दबाव आहे? न्याय व्यवस्थेत विशेष असे लोकं दिलासा देण्यासाठी बसवले आहेत का? ते कुणाच्या सूचनेने काम करत आहेत का? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.
विशिष्ठ राजकीय पक्षाच्या, विशिष्ठ विचारसरणीच्या लोकांनाच न्याय मिळावा यासाठी न्याय यंत्रणा काम करतात. हे असंच सुरू राहिलं तर देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात येईल असेही मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
पुढे संजय राऊत यांना किरीट सोमय्या यांच्या आजच्या पत्रकार परिषदेविषयी विचारले असता राऊत म्हणाले, पुढील 25 वर्ष त्यांना सत्ता मिळणार नाही. त्या वैफल्यातून आरोप केले जात आहेत. 58 कोटीचा घोटाळा झाला आहे.
तो पैसा कुठे गेला? न्यायदेवतेच्या डोळ्याला पट्टी असली तरी त्या पट्टीला छिद्र पडलं आहे. त्यातून ते आपल्या विचाराच्या लोकांकडे पाहत आहेत. तुम्ही किती हल्ले केले, फुसके बार केले तरी काही होणार नाही. सत्र न्यायालयाने तुम्हाला प्रश्न विचारले आहे.
ते काय मुर्ख आहेत का? त्यांनाही मानाचं स्थान आहे. तेही न्यायाचं स्थान आहे. त्यांनी तुमच्यावर बेईमानीचा ठपका ठेवला आहे. पैसे गोळा केले त्याचा हिशोब तुम्ही दिला नाही.
राजभवन सांगतं पैसे जमा झाले नाहीत. अजून कसला पुरावा हवा आहे? बातमीच्या कात्रणावर गुन्हा दाखल झाला नाही. राजभवनाने जो कागद दिला आहे. त्यावर गुन्हा दाखल झाला आहे असेही राऊत म्हणाले आहेत.