चोरटे सक्रिय ! जॉगिंग पार्क येथून एक दुचाकी लांबवली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- गुन्हेगारीमध्ये सातत्याने सर्वांच्या पुढे एक पाऊल टाकत असलेला नगर जिल्हा गुन्हेगारीचे विक्रम तोडत आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील भयभीत झाले आहे.

एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे मात्र अपेक्षित गुन्ह्याची उकल होत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. नुकतेच भिंगारमधील कॅबलरी मेस जॉगिंग पार्क येथून एक दुचाकी चोरीला गेली.

बुधवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सुनील काशिनाथ शेरफल (वय 50 रा. सुदर्शन कॉलनी, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी (एमएच 16 बीपी 3353) बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जॉगिंग पार्क येथे उभी केली होती. यानंतर एक तासामध्ये दुचाकीची चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पुढील तपास पोलीस नाईक द्वारके करीत आहेत. दरम्यान जिल्ह्यात दरदिवशी चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे.

रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. चोरटे जसे सक्रिय झाले आहे तसे आता पोलिसांनी देखील सक्रिय व्हावे अशी मागणी नागरिक करू लागले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24