‘या’ ठिकाणी चोरट्यांचा उच्छाद! दिवसाढवळ्या घरे फोडूून सव्वातीन लाखांचा मुद्देमाल पळवला?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- एकीकडे कोरोनाच्या संकटातून सर्वसामान्य नागरिक सावरत नाहीत. तोच ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घालत नागरिकांना जेरीस आनले आहे. चक्क भरदुपारी घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

ही घटना पाथर्डी तालुक्यात घडली. याबाबत सविस्तर असे की,  पाथर्डी शहरात वामनभाऊ नगरमधील पसायदान कॉलनीतील बंद घरात चोरट्यांनी दिवसा घराच्या मागील बाजुने कडीकोयंडा तोडुन घरात प्रवेश केला.

कपाटातील नव्वद हजार रुपये रोख व साडेचार तोळ्यांचे सोन्याचे दागीने असा ऐवज ज्ञानेश्वर बाजीराव गर्जे यांच्या घरातुन लांबविला.

गर्जे हे सकाळी घर बंद करुन गावाकडे गेले होते. चार वाजता आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांचे लक्षात आले. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. चोरटे परीसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

तर साकेगाव येथील सविता सातपुते यांच्या घराचे कुलुप तोडुन चोरट्यांनी दोन लोखंडी पेट्या चोरुन नेल्या. त्यात २५ हजार रुपये रोख व ७५ हजार रुपयाचे सोन्याचे दागीने चोरट्यांनी नेले आहेत. चोरीच्या घटना वाढत आहेत. तपास लागत नाही. नागरीकात नाराजी आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24