‘या’ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ…! एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोडी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- अलीकडे जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा धुमाकूळ घातला असून तर दुसरीकडे ग्रामीण व शहरी भागात देखील चोरट्यांचा धुमाकूळ घालत आहेत.

अनेक ठिकाणी तर चक्क भरदिवसा घरफोडी केली जात आहे तर काही ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकले जात आहेत. पोलिस मात्र या घटनांचा तपास लावण्यात अपयशी ठरत आहेत. पाथर्डी तालुक्यात चोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोडी केली आहे.

तालुक्यातील कोठेवाडी व बोरसेवाडी येथे एकाच रात्री घरफोडी झाली. या दोन्ही घटनात पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. कोठेवाडी येथील राजेंद्र पाराजी कोठे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५५ हजाराचा ऐवज चोरट्याने चोरून नेला.

तर बोरसेवाडी येथील हनुमान वामन चितळे यांच्या घराचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला.व घरातील सामानाची उचकापाचक करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला.

या दोन घटनांत तब्बल पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत अधिक तपास सपोनि. पाटील हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24