ट्रक चालकाला मारहाण करीत चोरट्यांनी 26 लाखांची दारू पळविली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- ट्रक चालकास मारहाण करून चोरटयांनी सुमारे 26 लाख 49 हजार 741 रु. लूट केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारा- झगडे फाटा शिवारात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील झगडे फाटा चांदे कसारा शिवारात दारूने भरलेले ट्रक येत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेले आरोपी योगेश कैलास खरात,रा. भोजडे चौकी, संतोष गौतम खरात रा.भोजडे चौकी, धनंजय प्रकाश काळे व एक अनोळखी इसम या आरोपींनी तो ट्रक अडवून चालकास बेदम मारहाण केली.

51 हजार 500 रुपये किमतीचे भिंगरी संत्रा कंपनीचे बाटल्या असलेले 100 बॉक्स तसेच 5 लाख 54 हजार 500 रुपये किमतीचे भिंगरी संत्रा कंपनीचे 950 बॉक्स, तसेच 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे भिंगरी संत्रा कंपनीचे 200 बॉक्स किंमत 7 लाख 28 हजार असे मिळून एकूण 26 लाख ४९ हजार हजार 741 रुपये ची लूट करून पसार झाले आहेत.

याबाबत शरद गोपीनाथ वरगुडे यांच्या फिर्यादीवरून वरील चार आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24