अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- नगर शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग समजला जाणारा सावेडी भागामध्ये बांधकाम व्यावसायिकाचे दुकान फोडून सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
सावेडीतील महावीर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स या दुकानात ही घटना घडली. याप्रकरणी दुकान मालक अरविंद अमृतलाल मुथा यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मुथा यांचे सावेडीत बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे दुकान आहे. 20 मे रोजी रात्री ते काल 24च्या रात्रीपर्यंत अज्ञात चोरट्यांनी खिडकी तोडली. दुकानातून विविध प्रकारच्या वस्तू चोरट्याने चोरून नेल्या.
एकूण सहा लाख 48 हजार आठशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन या चोरीची माहिती घेतली.
संबंधित परिसरामध्ये ज्यांच्या ज्यांच्या कडे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सद्धा हस्तगत केले आहे. चोरटे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असून काहींचा सुगावा सुद्धा लागल्याची प्राथमिक माहिती आहे.