चोरटयांनी स्टेट बँकेचे एटीएम फोडले; १९ लाख लंपास केलेच शिवाय अजूनही एक गोष्ट लंपास केली

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  नगर जिल्ह्यात नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील घारगाव गावच्या शिवारात गुरुवारी रात्री चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडले.

या एटीएम मधून सुमारे १९ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. नाशिक-पुणे महामार्गालगत तालुक्यातील घारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गुरुवारी रात्री २ च्या सुमारास चोरट्यांनी एटीएम लक्ष्य केले. एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारत डीव्हीआर लंपास केला.

एटीएममधून चोरटयांनी १९ लाख रुपये चोरून चोरटे पसार झाले. एटीएम मधून सुमारे १९ लाख रुपयांची रक्कम चोरीला गेली असल्याचे बँकेच्या शाखेचे शाखाधिकारी कांचन दाभाने यांनी सांगितले.

घटनेची माहिती समजताच घटनास्थळी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष फड आदींनी धाव घेतली.

आसपासच्या परिसरातील लोकांबरोबर पोलिसांनी मामुली विचारपूस केली. “रात्री कितीच्या काही आवाज आले का?, लाइट गेल्ती का घटनेची पाहणी करताना एटीम मधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरी गेल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज जमा करण्याचे काम सुरु केले.