परत कोठेवाडीत भरदिवसा चोरटे घुसले..? शेवटी खरा प्रकार समजला अन सर्वांचाच जीव भांड्यात पडला..!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- कोठेवाडीतील रमेश कराळे यांच्या बंद असलेल्या घराचे गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता दोन अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडुन घरात प्रवेश केला.

मात्र शेजारच्या घरातील युवकांनी हा प्रकार पाहीला. अन त्यांनी ग्रामसुरक्षा दलाच्या मोबाईलअँपवर कॉल केला. अन एका क्षणात परीसरातील सुमारे दोनशे व्यक्ती, पाथर्डीचे पोलिस अधिकारी व ९५ पोलिस यांना एकाच वेळी अँपवरुन घटनेची माहीती समजली. त्यानंतर अवघ्या पंधरा मिनीटात कराळे यांच्या घराला ग्रामस्थांनी वेढा दिला.

पोलिस अधिकारीही घटनास्थळी हजर झाले. दोन चोरट्यांना पोलिस व नागरीकांनी ताब्यात घेतले. यावेळी ग्रामस्थ व महीला आक्रमक झाल्या चोरट्यांना आमच्या ताब्यात द्या आम्ही पाहतो काय करायचे ते असा आरडाओरडा सुरु होता. मात्र पोलिसांनी नागरीकांना आवाहन करीत मंदिरात येण्याचे सांगितले. ग्रामस्थ आल्यानंतर हे चोरटे बनावट आहेत.

तुमच्या गावात एखादी घटना घडली तर तुम्हाला कशी मदत होवु शकते याचे हे जिल्हा पोलिस दलाने आयोजित केलेले प्रात्याक्षिक होते असे सांगितले. त्यानंतर सर्वांचाचजीव भांड्यात पडला. कोठेवाडी गावात गुरुवारी अचानक प्रात्याक्षिक राबविण्याचा निर्णय पोलिस दलाने घेतला होता. गावचे पोलिस पाटील वसंत वाघमारे व सरपंच संजय चितळे यांना याबाबत कल्पना दिली.

मात्र गोपनियात पाळण्याचे सांगितले. त्यानुसार सव्वा अकरा वाजता कराळे यांच्या बंद घराचे कुलुप दोन चोरट्यांनी तोडले. आवाज येताच शेजारच्या युवकाने ग्रामसुरक्षा दलाच्या मोबाईल अँपवर काँल करुन ही माहिती दिली. त्यानंतर अवघ्या दहा मिनीटात सुमारे शंभर ग्रामस्थ, सोळा मिनीटात पाथर्डीचे पोलिस अधिकारी व कर्मचारी असा मोठा फौजफाटा कोठेवाडीत दाखल झाला.चोर पकडले आणि पोलिसांनी त्यांना सरकारी वाहनात बसविले. त्यानंतर हे प्रात्य़ाक्षिक असल्याचे सांगण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24