अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डीजीटल रूमची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूने आत प्रवेश करत ३५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेल्याची घटना नुकतीच संगमनेर तालुक्यातील पठारभागातील भोजदरी येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील भोजदरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. डिजिटल रूममध्ये ४० इंची टीव्ही होता.
दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने डिजिटल रूमची मागील भिंत फोडून आत प्रवेश आत प्रवेश करत सामानाची उचाकापाचक केली. ३५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून पोबारा केला.
हि चोरी मुख्याध्यापक गणपत कुर्हाडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.