अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे चोरटे कोणत्याही प्रकारच्या वस्तू चोरी करत आहेत.
नुकतीच राहाता शहरातील लोकरूची नगर मधील मेडिकल स्टोअरच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की,
राहाता शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती व मेडिकल झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकरूची नगरमध्ये महेश प्रभाकर डांगे यांचे मेडिकल स्टोअर्स आहे. ते नेहमी प्रमाणे आपले मेडिकल स्टोअर्स रात्री बंद करून गेले.
परंतु मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केले. गल्यातील रोख रक्कम ४२ हजार ८०० रुपये चोरून नेले.
याप्रकरणी मेडिकल स्टोअरचे मालक महेश प्रभाकर डांगे( रा. दहेगाव ता. राहाता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी भेट देऊन पाहणी केली.