अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- सध्या शहरासह ग्रामीण भागात देखील दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनांच्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. काल पहाटेच्या सुमारास चोरटयांनी शेवगाव येथून चारचाकी तवेरा या चारचाकी वाहनाची चोरी केली.

यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत अरुणा शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीसांनी एका अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेवगाव येथे आमचे सायकल दुकान आहे. दैनंदिन कामासाठी तवेरा (एम.एच.१६ बी.एच ५६३८) हे चारचाकी वाहन घेतले होते.

बुधवारी या गाडीमध्ये घरातील सर्वजण बीड येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेलो होतो. त्याच दिवशी रात्री ११ वाजता पुन्हा माघारी आल्यानंतर गाडी घरासमोर व्यवस्थित पार्कीग करुन व लाँक लावून घेतले. मी स्वत: सकाळी ६ वाजता उठले असता घरासमोरील गाडी गायब झाल्याचे निदर्शनास आले.

गाडी पार्कींग केल्याच्या ठिकाणी काचांचा खच पडलेला दिसला. इतरत्र शोधाशोध केली मात्र गाडी आढळून आली नाही. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24