अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना नागरिकांना आता भुरट्या चोरट्यांचा सामना करावा लागत आहे.
नुकतीच एका शेतकऱ्याच्या शेतातील पाच गोण्या भुईमुगाच्या शेंगा चोरून नेल्याची घटना देहरे येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील देहर येथील शेतकरी विजय विठ्ठल लांगडे यांनी त्यांच्या शेतात भुईमुगाचे पीक घेतले आहे.
सध्या भूईमूग काढणीला आलेला आहे. मात्र अज्ञात चोरट्याने याच संधीचा फायदा घेत लांगडे यांच्या शेतातील सुमारे १० हजार रूपये किमतीच्या ५ गोण्या ओल्या शेंगा चोरून नेल्या आहेत.
याप्रकरणी लांगडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोना.गांगुर्डे हे करत आहेत.