अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- लॉकडाऊन कार्यकाळ दरम्यान जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आकडेवारी दिसून येत आहे. यातच चोरी, लुटमारी आदी घटना तर सर्रास घडू लागल्या आहेत.
यातच नेवासा तालुक्यातील देवगडफाटा येथे एका मोबाईल शॉपीच्या छताचे पत्रे कापून आत प्रवेश करुन 50 हजार रुपये किंमतीच्या वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे सलीम शेख यांचे मोबाईल शॉपी हे दुकान आहे.
मध्यरात्री या दुकानाचा वरील पत्रा कापून दुकानातून तब्बल 50 हजार रुपये किमतीचे मोबाईल संच व इतर वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या.
दुकान मालक सलीम शेख यांचा मुलगा दुकानावर आला असता हा प्रकार त्याच्या लक्षात आला. याबाबत तात्काळ नेवासा पोलिसांना माहिती देण्या आली व पोलीस घटनास्थळी आले. व पाहणी केली. उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.