आजी नातवाला चाकूचा धाक दाखवत चोरटयांनी लुटले 12 लाख

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- दरोडेखोरांच्या एका टोळीने शिर्डी शहरातील एका बंगल्यात घुसून आजी आणि नातवाला धारदार शस्राचा धाक दाखवत रोख रकमेसह सोने चांदी असा सुमारे 12 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डी शहरातील नालारोडलगत असलेल्या सितानगरमधील गोंदकर वस्तीवरील हरिओम बंगल्यात आशिष अनिल गोंदकर (वय 23) आणि त्यांची आजी ताराबाई गोडगे तसेच आजीची आई सुगंधाबाई कडलग (वय 75) असे तिघेजण झोपले होते.

मध्यरात्रीच्या सुमारास आजीचा ओरडण्याचा आवाज आला असता नातू अशिष आजीच्या रुममध्ये गेला. त्याठिकाणी 4 इसम तोंडाला कपडे बांधून उभे होते व त्यांच्या हातात धारदार लोखंडी चाकू, कटावनी दिसून आले. चोरटयांनी चाकूचा दाख दाखवून त्यांच्या जवळील सोने लुटले.

तसेच कपाटातील रोख रक्कम सोने-दागिने असे एकूण 12 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज शस्राचा धाक दाखवून पोबारा झाले. दरम्यान, घटनेनंतर काही वेळातच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या आदेशानुसार उत्तर नगर जिल्ह्यातील पोलीस पथके दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहे. दरम्यान या घटनेनंतर शिर्डीत घबराटीचे वातावरण पसरले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24