अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- मनमाड रोडवरील देहरें शिवारातील टोलनाक्या जवळील हॉटेल अर्जुन अँड परमिटरूमच्या खिडकीच्या फळ्या तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला आतील सुमारे 62 हजार रुपये किमतीची विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या.
याबाबतची अधिक माहिती अशी की, देहरे येथील अर्जुन नामदेव काळे (वय.33 राहणार पांढरे वस्ती देहरे ) यांचे मनमाड रोडवरील देहरें शिवारात टोलनाक्या जवळील हॉटेल अर्जुन अँड परमिट रूम नावाचे हॉटेल आहे.
या हॉटेलच्या खिडकीच्या फळ्या तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. हॉटेल मध्ये दारू ठेवण्यासाठी केलेल्या स्टोअररूमचे कुलूप कडी कोयंडा तोडून देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा 62 हजार रुपये किमतीची दारू चोरून नेली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अर्जुन काळे यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे हे करीत आहेत.