चोरटयांनी साड्या, लेडीज टॉपसह पळविले लेडीजचे अंतर्वस्त्र; नेवाश्यातील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- नेवासा येथील ब्युटी पार्लर व लेडीज शॉपी दुकानातून 133 साड्या, 94 लेडीज टॉप, लेडीज ज्वेलरी व रोख रक्कम असा 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना नेवासा येथे घडली आहे.

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अश्विनी अमोल पागिरे (वय 28) रा. पावन गणपती मंदिर परिसर नेवासा खुर्द यांनी फिर्याद दिली आहे.

नेवासा-नेवासा फाटा रस्त्यावर पावन गणपती समोर असलेल्या अश्विनी पागिरे यांच्या साक्षी ब्युटी पार्लरचा कडी-कोयंडा उचकाटून चोरट्यांनी वेगवेगळ्या दराच्या २४ हजारांचा १३३ साड्या,

९४ लेडिज टॉप, १३ हजार रुपयांचे साहित्य, कपडे, ६७ हजारांच्या १ ग्रॅम ज्वेलरीचे १२ नग, बांगड्या, साडेतीन हजारांची रोकड,

असे एकूण १ लाख १० हजार १३१ रुपये किमतीचे साहित्य लंपास केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुळशीराम गिते करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office