अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- नगर-मनमाड रोडवर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हॉटेल रुस्तम समोरून सहा लाख रुपये किंमतीचा राहुरी तालुक्यातील देसवंडी फाटा येथील 407 टेम्पो चोरट्यांनी पळविला आहे.
याप्रकरणी देवसंडी फाटा येथील शिवाजी पवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर-मनमाड रोडवर हॉटेल रुस्तम समोरून सहा लाख रुपये किंमतीचा एमएच 17-बी.वाय. 6370 हा चोरट्यांनी पळून नेला.
या चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास अरूणा गांगर्डे या करत आहे. गेल्या काही दिवसांत रात्रीच्यावेळी एमआयडीसी परिसर आणि नगर-मनमाड रोडवरील गुन्ह्यात वाढ झाली आहे.