अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घेतला आहे. यामुळे पोलीस प्रशासन देखील चांगलेच हैराण झाले आहे. नुकतेच कर्जत मध्ये अशीच एक धाडसी चोरीची घटना घडली आहे, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरांनी पळविली. शुक्रवारी सकाळी भविकांसह पुजारी आरती करण्यास गेल्यावर ही बाब लक्षात आली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरांनी पळविली. निमगाव गांगर्डे येथील पोलीस पाटील अशोक गांगर्डे यांनी चाेरीची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली. सराईत चोरटयांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बाजूला केल्याने अडचणीत वाढ झाली आहे. तसेच जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात ही दानपेटी फोडून त्यातील रक्कम घेऊन चोर पसार झाले.
श्वानपथकाने शाळेच्या संरक्षक भिंतीपर्यंत माग काढला. परंतु, तेथून पुढे चोरटे वाहनाने पसार झाले. चोरांना लवकरात लवकर शोधून जेरबंद करू, असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरजीत मोरे यांनी दिले.