चोरटयांनी लंपास केली पावणेचार लाखांची दारू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-बंद दुकानांचे शटर तोडून 03 लाख 75 हजार 410 रुपयांची भिंगरी दारू अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा चौफुलीवर घडली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . दरम्यान याबात अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिला दमयंती शिखरे यांचे कोकमठाण हद्दीत पुणतांबा चौफुलीवर दुकान आहे.

शनिवार दि.13 मार्च रोजी रात्री दहा वाजेनंतर तर आज सकाळी 9.30 वाजेच्या दरम्यान चोरट्याने शटर उचकटून आतील 03 लाख 75 हजार 410 रुपयांचा देशी भिंगरी कंपनीच्या 180 मिलीच्या 173 खोके प्रति खोके किंमत 2 हजार 170 ) लंपास केले आहे.

या प्रकरणी दमयंती विजय शिखरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विशेष बाब म्हणजे मागील महिन्यात असा एक ट्रकच चोरट्यांनी लंपास केला होता.

आता ही एका महिन्यात दुसरी घटना उघडकीस आली असून कोपरगाव शहर पोलिसांचे या घटनेने धाबे दणाणले आहे. त्यामुळे या दारुचोरांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलीसांपुढे उभे ठाकले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24