पावसात चहा-भजी खायचा विचार करताय? पण थांबा, आधी हे वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health News:आपल्याकडे चहा या लोकप्रिय पेयासोबत अनेक पदार्थ खाण्याची लोकांना सवय आहे. काहींना चहासोबत बिस्किटे खायला आवडतात तर काहींना इतर पदार्थ.

असे असले तरी चहासोबत काही पदार्थ खाणे आरोग्यास अपायकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामध्ये भजी आणि बेसनापासून बनविलेल्या पदार्थांचाही समावेश आहे.पावसाळी वातावरणात भजी आणि चहाचा बेत ठरलेलाच असतो.

मात्र, अशा खवय्यांना तज्ज्ञांनी हा सावधानतेचा इशारा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते चहासोबत बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात. तसेच शरीराची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे बेसनापासून बनवलेल्या पदार्थांचे चहासोबत कधीही सेवन करू नका.

त्यात आपली भजीही आलीच.याशिवाय चहा सोबत इतरही काही पदार्थ खाणे अयोग्य असल्याचे तत्ज्ञ सांगतात. काही जणांना चहाच लिंबू पिळून प्यायची सवय असते. पण त्यामुळे चहा ऍसिडिक बनतो. सकाळी रिकाम्या पोटी असा लिंबू-चहा प्यायल्यास त्रास होऊ शकतो.

सुखा मेवा, हिरव्या पालेभाज्या, तृणधान्ये, कडधान्ये, कडधान्ये असे लोहयुक्त पदार्थ चहासोबत टाळावेत. चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट असतात जे लोहयुक्त पदार्थ शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करतात.

गरम चहासोबत किंवा चहानंतर लगेच थंड पदार्थ कधीही खाऊ नका. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. चहा प्यायल्यानंतर, किमान ३० मिनिटे थंड काहीही खाणे टाळा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.