Investment Tips : आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या बचतीच्या पैशावर चांगला परतावा मिळावा अशी इच्छा असते. विशेष म्हणजे, आज बरेच लोक आपले पैसे शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवण्यास प्राधान्य देतात. गुंतवणुकीच्या या क्षेत्रांमध्ये चांगला परतावा मिळण्याची अफाट क्षमता आहे, परंतु येथे बाजारातील जोखीमही तितकीच जास्त आहे. म्हणूनच लोकं मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणे पसंद करतात.
अशातच आज आम्ही तुम्हाला एका खास बँकेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणुकीवर भरघोस व्याज मिळत आहे. देशातील अनेक लोक या बँकेच्या एफडीमध्ये आपले पैसे गुंतवत आहेत. चाल या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया-
मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँक HDFC ने अलीकडेच मोठ्या प्रमाणात मुदत ठेवींवरील व्याजदर 2 कोटींवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवले आहेत. HDFC बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मॅच्युरिटी बकेटवर 4.50 ते 7 टक्के व्याजदर देत आहे.
त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याज दर 5 टक्के ते 7.75 टक्के आहे. याशिवाय एचडीएफसी बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीच्या व्याजदरातही वाढ केली आहे.
बँक 90 दिवस ते 6 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर 6.25 टक्के व्याजदर देत आहे. याशिवाय, 6 महिने आणि 1 दिवस ते 9 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर 6.50 टक्के व्याजदर मिळत आहे.
एचडीएफसी बँकेने याबाबत माहिती दिली आहे की 9 महिने आणि 1 दिवस ते 1 वर्षाच्या एफडीवर 6.65 टक्के व्याजदर मिळत आहे. याशिवाय, एक वर्ष ते 15 महिन्यांत मुदत ठेव योजनेवर 7 टक्के व्याजदर मिळत आहे.